सर्वात आधी काजू, बदाम यांचे तुकडे करून घ्यायचे आहे. काजूचे दोन दोन तुकडे करावे आणि एका एका बदामाचे दोन ते तीन उभे पातळ तुकडे करावे. त्यानंतर दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. हे पाणी आपल्याला नंतर शिऱ्यामध्ये टाकायचे आहे.
त्यानंतर आपला गॅस चालू करून त्यावर कढई ठेवावी. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते अडीज चमचे तूप टाकायचे आहे. गॅस बारीक ठेवावा. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मनुके टाकून भाजून घ्यायचे आहे मनुके चांगले फुगले की लगेच एका छोट्या डिश मध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर तुकडे केलेले काजू त्याच तुपामध्ये टाकायचे आहे. काजूला साधारण गुलाबी किंवा तांबूस कलर येईपर्यंत परतावे. जास्त करू नये. परतून झाल्यानंतर काजू सुद्धा त्या डिश मध्ये काढून घ्यावे.
Pic by - Shaila Jagdales Recipe
त्यानंतर बाकीचे घेतलेले तूप कढई मध्ये टाकायचे आहे. तूप टाकल्यानंतर रवा टाकावा. मोठा गॅस करून रवा आणि तूप चांगले एकत्र करून घ्यायचे आणि रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. सतत हलवत राहून रव्याला तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यावे. रवा करपू नये म्हणून सतत हलवावे. रवा चांगला खरपूस भाजून झाल्यानंतर दुसऱ्या गॅसवर ठेवलेले छोट्या पातेल्यामधील एक ते दीड ग्लास गरम पाणी यामध्ये एकत्र करायचे आहे. पाणी आपल्याला जसे लागेल तसे टाकायचे आहे. पाणी टाकल्यानंतर रवा आणि पाणी चांगले एकत्र करावे. साधारण आपण एक वाटी रव्याला दीड ग्लास गरम पाणी घेतलेले आहे. सर्व मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे. टाकलेले पाणी रव्याने चांगले शोषण घ्यायला हवे अशा पद्धतीने मिश्रण एकत्र करावे आणि हलवत रहावे.
पाणी शोषण झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकावी. कमी गॅस ठेवून साखर आणि रव्याचे मिश्रण चांगले एकत्र करावे. त्यानंतर आपण भाजून घेतलेले काजू आणि मनुके यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचबरोबर पातळ उभे चिरलेले बदामाचे काप यामध्ये टाकायचे आहे. हे सर्व चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर विलायची सुंठ पावडर यामध्ये टाकावी आणि सर्व मिश्रण चांगले एकत्र हलवून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण चांगले एकत्र करून झाल्यानंतर व परतुन झाल्यानंतर आपला शिरा प्रसादासाठी व खाण्यासाठी पूर्णपणे तयार होईल.
अशा पद्धतीने आपला तुपातील रव्याचा शिरा पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा.
रेसिपीचा व्हिडीओ सुद्धा आपण खाली पाहू शकता. 👇
Tags -
shira | shira images | shira recipe in marathi | sheera recipe in marathi | rava sheera recipe | tupatil shira recipe in marathi | suji ka sheera | suji sheera recipe | suji meaning in marathi | suji halwa recipe | suji recipe | how to make sheera | how to make sheera in marathi | how to make rava sheera | how to make pineapple sheera | how to make shira in marathi | how to make sheera without milk | how to make shira in marathi | how to make sheera at home | how to make sheera with water | sheera recipe | sheera images | prasadacha sheera kasa banvaycha | rava sheera kasa banvaycha | goda sheera recipe | best rava sheera recipe | maharashtrian rava sheera recipe | rava sheera | rava sheera recipe in marathi | rava sheera prasad recipe | ravyacha shira | ravyacha sheera | ravyacha sheera recipe | shaila jagdale | shaila jagdales recipe
शिरा रेसिपी मराठी । शिरा फोटो । शिरा कसा करावा । शिरा recipe । शिरा कसा करायचा । शिरा कसा करायचा दाखवा । शिरा कसा करतात । शिरा कसा बनवायचा शिरा । शिरा कसा बनवतात ते दाखवा । शिरा कसा बनवायचा ते दाखवा । शिरा कसा बनवायचा रव्याचा । रव्याचा शिरा कसा बनवायचा । रव्याचा शिरा कसा बनवतात । रव्याचा शिरा बनवण्याची पद्धत । रव्याचा शिरा कसा बनवावा । रव्याचा शिरा बनवण्याची रेसिपी । रव्याचा गोड शिरा । प्रसादाचा शिरा रेसिपी मराठी । प्रसादाचा शिरा दाखवा । प्रसादाचा शिरा कसा करायचा । प्रसादाचा शिरा कसा बनवायचा । प्रसादाचा शिरा कसा बनवतात । प्रसादाचा रवा कसा बनवायचा । प्रसादाचा शिरा बनवण्याची रेसिपी । सत्यनारायण प्रसाद रेसिपी मराठी । सत्यनारायण प्रसाद कसा बनवायचा । सत्यनारायण प्रसादाचा शिरा । सत्यनारायण पूजा प्रसाद । सत्यनारायण भगवान का प्रसाद ।
0 Comments