अगदी सोप्प्या पद्धतीने आपण इडलीसाठी लागणारे पीठ बनवू शकता. खाली दिलेल्या संपूर्ण कृतीचा वापर करून सहज पद्धतीने पीठ बनवा. 👇👇
साहित्य :-
१) तांदूळ १ किलो
२) उडीद डाळ पावशेर
३) तांदळाचा भात १ वाटी
हे वाचले का 👉 चमचमीत आणि मस्त असा महाराष्ट्रातील वडापाव बनवा घरच्याघरी 👈
कृती :-
इडलीचे पीठ पूर्णपणे तयार होण्यासाठी साधारण ७ ते ८ तास लागतात. जर आज सकाळी किंवा दुपारी आपल्याला इडली बनवायची असल्यास त्याचे लागणारे पीठ हे आदल्या दिवशी संध्याकाळी बनवावे. जेणेकरून पीठ चांगले व्यवस्थित तयार होते.
संध्याकाळी किंवा रात्री :- सर्वात आधी उडदाची डाळ आणि तांदूळ हे दोन्ही चांगले निवडून घ्यायचे आहे. चांगले निवडून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये दोन्हीही एकत्र करायचे आहे. स्वच्छ पाण्याने हे चांगले धुऊन घ्यायचे आहे. साधारण दोन वेळा तांदूळ आणि उडदाची डाळ चांगली धुऊन घ्यायची आहे. दोन पाण्याने चांगले स्वच्छ धुऊन झाल्यानंतर त्यामध्ये भिजत ठेवण्यासाठी पाणी टाकायचे आहे. पाण्याचे प्रमाण हे साधारण पाणी टाकल्यानंतर आपल्या हाताची बोटे त्यात बुडवून मधील बोटाच्या दुसऱ्या रेषेपर्यंत येईल इतके पाणी ठेवावे. हाताची बोटे ही पूर्णपणे पाण्यामधील तांदूळ आणि डाळ या दोघांना ही स्पर्श करावी आणि मग त्याच्यावरती आपल्या मधल्या बोटाच्या दुसऱ्या रेषेपर्यंत येईल इतके पाणी ठेवावे. पाणी टाकल्यानंतर त्यावरती झाकण ठेवावे आणि ते पातेले एका व्यवस्थित ठिकाणी ठेवावे. साधारण तीन ते पाच तास ठेवावे. आपण हे मिश्रण रात्री पाणी टाकून ठेवले असेल तर सकाळपर्यंत ठेवले तरी चालेल.
हे अवश्य वाचा 👉 ड्राय फुड्सचे मोदक बनवा या गणेश चतुर्थीला 👈
दुसऱ्या दिवशी सकाळी :- आता पातेल्यावरील झाकण काढून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे. सर्व पाणी त्यातील निघायला हवे. पाणी काढून झाल्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने हे सर्व वाटून घ्यायचे आहे. हे सर्व मिश्रण वाटत असताना जास्त बारीक आणि जास्त मोठे न ठेवता मध्यम पद्धतीने वाटून घ्यायचे आहे. मिश्रण वाटत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्ध्या पेल्यापेक्षा कमी पाणी घेऊन त्यात टाकावे. म्हणजे आपले मिश्रण व्यवस्थित वाटून होईल. अशा पद्धतीने सर्व मिश्रण चांगले वाटून घ्यायचे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे.
त्यानंतर समजा जर आपले पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर आपल्या पद्धतीने आपण अर्धा तांब्या किंवा एक तांब्या पाणी टाकून पीठ मध्यम आकाराचे करू शकता. नंतर आपल्याला हे पीठ पळीच्या सहाय्याने फेटून घ्यायचे आहे. फेटून घेत असताना काळजी घ्यावी की आपण ज्या दिशेने पळी फिरवत आहे त्याच दिशेने शेवटपर्यंत पोळी फिरवून फेटून घ्यावे. उलट सुलट पद्धतीने भेटू नये. त्यामुळे आपले पीठ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून ज्या बाजूने फेटत आहे त्याचबाजूने शेवटपर्यंत फेटून घ्यावे. चांगले फेटून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे. झाकण ठेवल्यानंतर साधारण चार ते पाच तास पीठ चांगले तयार होण्यासाठी तसेच ठेवून द्यावे. वरील झाकण चांगले घट्ट पद्धतीने बसवावे जेणेकरून त्यामधून हवा आत जायला नको. म्हणजे आपले पीठ व्यवस्थित तयार होते.
चार ते पाच तासानंतर तांदळाचा थोडासा भात शिजवून घ्यायचा. आपण पीठ फुगण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी सोडा किंवा इनो चा वापर न करता भाताचा वापर करणार आहे. भात शिजवून झाल्यानंतर त्यातील एक वाटी भात आपल्याला लागणार आहे तो एक वाटी भात काढून घ्यावा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भात बारीक करून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यात लहान एक दोन चमचे पाणी टाकावे आणि मग वाटून घ्यावे. भात चांगला बारीक वाटून झाल्यानंतर आपल्या पिठामध्ये टाकायचा आहे. पळीच्या सहाय्याने भात चांगला मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. त्यानंतर सर्व मिश्रण पुन्हा एकदा चांगले फेटून घ्यायचे आहे. पहिल्या वेळेस जी फेटायची बाजू वापरली आहेत त्याच बाजूने आता सुद्धा फेटून घ्यायचे. एक दोन मिनिट फेटून झाल्यानंतर आपले पीठ पूर्णपणे तयार होईल. यातून आपण हवे ते बनवून (इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे इत्यादी.) खायचा आनंद घेऊ शकता.
अशा पद्धतीने आपले इडलीचे पीठ पूर्णपणे तयार झाले आहे.आपण या पिठामधून इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे इत्यादी पदार्थ बनवू शकता.
तुम्ही ही रेसिपी वाचून नक्की आपल्या घरी बनवून पहा आणि आम्हाला देखील कमेंट च्या माध्यमातून कळवा की आपली रेसिपी कशा पद्धतीने झाली आहे.






0 Comments