Subscribe Us

Header Ads

उकडीचे मोदक कसे बनवायचे ? खूप सोपी पद्धत । ukadiche modak | how to make ukadiche modak in marathi




चविष्ट आणि सुंदर पद्धतीने उकडीचे मोदक बनवायला शिका... - वाचा आणि बनवा 👇

Pic by :- Shaila Jagdales Recipe

साहित्य :- १) ओला नारळ १ २) तांदळाचे पीठ पावशेर ३) गूळ १ वाटी ४) शेंगदाणे अर्धी वाटी ५) मनुके १५ ते २० ६) खसखस १ चमचा ७) तेल ३ पळी ८) मीठ चवीनुसार ९) विलायची पावडर १ चमचा

Pic by :- Shaila Jagdales Recipe
कृती :- 
सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवावी आणि त्या कढईमध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी टाकायचे आहेत. शेंगदाणे करपून द्यायचे नाहीयेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचे साल निघतील अशा पद्धतीने खरपूस आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते थोडे थंड होऊन द्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी शेंगदाणे हातावरती घेऊन दोन्ही हात एकमेकांवरती रगडून शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचे साल काढून झाल्यानंतर शेंगदाण्याचे दोन दोन भाग करायचे आहेत. म्हणजेच एका शेंगदाण्याच्या दोन पाकळ्या तयार करायचे आहेत ते तुम्ही हातांच्या नखाच्या सहाय्याने काढू शकता. लक्षात ठेवावे की शेंगदाणे जास्त बारीक करायचं नाहीये म्हणजेच आपल्याला शेंगदाण्याचे कूटही करायचा नाहीये फक्त शेंगदाण्याचे आपल्याला दोन दोन पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत.

Pic by :- Shaila Jagdales Recipe

त्यानंतर आपल्याला मोदकाला लागण्यासाठी सारण तयार करायचा आहे. त्यासाठी सर्वात आधी ओला नारळ घ्यायचा आहे आणि विळीच्या किंवा किसणीच्या सहाय्याने नारळ बारीक करून घ्यायचा आहे नारळाचा बारीक किस व्हायला हवा. त्यानंतर गॅस चालू करावा आणि गॅस वरती कढई ठेवावी. साधारण एक पळी तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा खसखस टाकायची आहे. गॅस बारीक ठेवून खसखस चांगली परतून घ्यायचे आहे. त्यानंतर किसलेले खोबरे, गूळ एक वाटी, १५ ते २० मनुके, पाकळ्या केलेले शेंगदाणे, विलायची पावडर १ चमचा हे सर्व टाकून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचे आहे. हे करत असताना गॅस बारीक ठेवायचा आहे. सारणाचा कलर साधारण लालसर चॉकलेटी कलर येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं सारण तयार होऊन जाईल.

आता मोदकाच्या पिठाला उकड करून घ्यायची आहे. त्यासाठी गॅस चालू करून त्यावर पातेले ठेवायचे आहे. साधारण एक तांब्या पाणी टाकायचं आहे. आपल्याला इतकं पाणी लागणार नाहीये पण जसे लागेल तसे पाणी वापरणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एक पळी तेल व चवीनुसार मीठ टाकायचे आहे. पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून पातेल्यामधील अर्धा तांब्या पाणी काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण घेतलेले पावशेर तांदळाचे पीठ पातेल्यामध्ये टाकायचे आहे (पिठासाठी तांदूळ हे रेशनिंग किंवा कोळंब वापरावे). पीठ पातेल्यामध्ये टाकल्यानंतर कलथ्याच्या सहाय्याने चांगले हलवत राहायचे आहे. त्याच्या गुठल्या होऊ नये याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर लागेल तसे पाणी त्यामध्ये टाकत जावे. पाणी जास्तही टाकू नये. जास्त पातळ पीठ करायचे नाही. पीठ थोडं जाडसरच ठेवायचं आहे. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचे आहे व गॅस तसाच बारीक ठेवायचा आहे. साधारण दोन मिनिट हे तसेच ठेवायचे आहे. दोन मिनिट झाल्यानंतर त्यावरील झाकण काढून घ्यायचे आहे आणि पीठ व्यवस्थित शिजले आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या हाताला थोडसं पाणी लावायचा आहे आणि तो हात पिठाला लावायचा आहे. ते पीठ आपल्या हाताला नाही लागले तर आपले पीठ शिजवून तयार झालेले आहे आणि जर ते हाताला चिकटत असेल किंवा लागत असेल तर पीठ थोडेसे अजून एक दोन मिनिटं झाकण ठेवून पुन्हा शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहे.


पीठ आपल्याला गरम गरम मळून घ्यायचे आहे. जर मळत असताना आपल्याला चटके बसत असेल तर एका मोठ्या ग्लासच्या उलट्या बाजूने मळून घ्यायचे आहे. ग्लासने मिळत असताना पीठ हळूहळू आपले थंड सुद्धा होऊन जाईल. ग्लासच्या सहाय्याने चांगले दाबून मळून घ्यायचे आहे. त्यानंतर हात थोडासा ओला करून हाताच्या साहाय्याने चांगले पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ आपण जितकं चांगले मळून घ्याल तितकेच आपले मोदक सुद्धा चांगले होतात. चांगल्या पद्धतीने आपले पीठ मळून घ्यायचे आहे.

आता महत्त्वाचे आपल्याला मोदक करायला घ्यायचे आहेत. आपण मोदक तयार केल्यानंतर चाळणीमध्ये उकडण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीला थोडसं हाताच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचे आहे. तेल लावल्यामुळे आपले मोदक उकडताना किंवा उकडल्यानंतर चाळणीला चिकटत नाहीत. त्यानंतर मोदकाचे छोटे भांडे घ्यायचे आहे आणि त्या भांड्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडे थोडे पीठ घ्यायचे आहे आणि ते मोदकाच्या भांड्यामध्ये बोटांच्या सहाय्याने लावून घ्यायचे आहे म्हणजेच ठेवायचे आहे. आत मध्ये खोलगट भाग तयार होईल अशा पद्धतीने पीठ आत मधी ठेवायचे आहे. बोटांच्या सहाय्याने खोलगट भाग तयार करून घ्यायचा आहे. पीठ हाताला चिकटत असेल तर बोटांना थोडसं पाणी लावून कृती करायची आहे. त्यानंतर तयार केलेले सारण थोडे थोडे करून त्या खोलगट भागामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर पिठाचे आवरण वरतून लावून बंद करून घ्यायचे आहे. बंद केल्यानंतर हाताच्या साह्याने दाबून घ्यायचे आहे. त्यानंतर मोदकाच्या भांड्याचे झाकण उघडून तयार झालेला मोदक चाळणी मध्ये काढून ठेवायचा आहे. अशाच पद्धतीने एक एक मोदक तयार करून चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहे.


मोदक पूर्णपणे तयार झाल्यानंतर आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर एक पातेले ठेवायचे आहे. साधारण अर्धे पातेले इतके पाणी पातेल्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर मोदक ठेवलेली चाळण त्या पातेल्यावर ठेवायची आहे. त्यानंतर मोदक ठेवलेल्या चाळणी वरती झाकण ठेवायचे आहे. साधारण सात ते आठ मिनिट उकडण्यासाठी तसेच ठेवायचे आहे. सात ते आठ मिनिट झाल्यानंतर झाकण काढून पाहायचे आहे आपले मोदक पूर्णपणे तयार झालेले असतील.
Pic by :- Shaila Jagdales Recipe
अशा पद्धतीने आपले उकडीचे मोदक पूर्णपणे तयार झालेले आहेत.
ही रेसिपी आपण नक्की घरी करून पहावी आणि आम्हाला सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवावी.
तुम्हाला ही कृती आवडली असल्यास नक्की इतर महिलांना शेअर करा.


Tags :-  

मोदक बनवण्याची सोपी पद्धत | उकडीचे मोदक कसे बनवायचे | मोदक कसे बनवायचे | उकडीचे मोदक कसे बनवायचे । उकडीचे मोदक फोटो । उकडीचे पदार्थ । उकडीचे मोदक कसे करायचे । मोदक रेसिपी । मोदक बनाने की विधि । मोदक रेसिपी मराठी । मोदक साचा । मोदक images । उकडीचे मोदक । उकडीचे मोदक कसे बनवतात । उकडीचे मोदक कसे करायचे । उकडीचे मोदक रेसिपी मराठी । उकडीचे मोदक बनवण्याची पद्धत । उकडीचे मोदक कसे बनवायचे दाखवा । उकडीचे मोदक फोटो । उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी । उकडीचे मोदक रेसिपी मराठी । गणपती मोदक फोटो । गणपतीचे मोदक कसे बनवायचे । गणपतीचे मोदक कसे बनवतात । मोदक गणपती बाप्पा । मोदक सारण प्रमाण । 

ukadiche modak | ukadiche modak recipe | modak dumplings | modak in marathi | modak recipe | modak recipe marathi | modak kaise banate hain | modak ki recipe | modak kaise banane ka | modak kaise banvae | modak images | ukadiche modak | ukadiche modak recipe | ukadiche modak recipe in marathi | tandalache ukadiche modak recipe in marathi | ukadiche mango modak recipe in marathi | simple ukadiche modak recipe in marathi | easy modak recipe in marathi | instant modak recipe in marathi | easy modak recipe in hindi | modak kase banvayche | modak kashi banvaychi te dakhva | modak kasa banavtat | modak kasa karaycha dakhva | modak benefits | gud ke modak recipe | ganpati modak | ganpati modak images | ganpati modak photo | ganpati modak recipe | sweet modak ganpati | sweet modak food | how to make modak | how to make modak saran | 


Hashtags :-

#modak #ukadichemodak #sweet #maharashtrafood


Post a Comment

0 Comments