Subscribe Us

Header Ads

बटाट्यापासून बनवा कुरकुरीत शेव । बटाटा शेव रेसिपी । आलू भुजिया | batata sev recipe in marathi | aloo sev | aloo bhujia recipe




आपण कुरकुरीत पद्धतीने बटाट्याची शेव बनवू शकता. या शेवला आपण आलू भुजिया देखील म्हणू शकता - वाचा आणि बनवा 👇

Pic by : Shaila Jagdales  Recipe

साहित्य :- १) बटाटे पावशेर २) बेसन पीठ पावशेर ३) मिरची पावडर १ चमचा ४) हिंग चिमूटभर ५) तेल तळण्यासाठी ६) मीठ चवीनुसार



कृती :-
सर्वात आधी पावशेर बटाटे स्वच्छ धुऊन कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत. बटाटे उकडून झाल्यानंतर त्यांची साल काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे. त्यासाठी एक किसनी आणि त्याच्या खाली एक परात ठेवावी. जेणेकरून किसलेला बटाटा त्या परातीमध्ये पडेल. बटाटे चांगले किसून घ्यायचे आहे बारीक पद्धतीने. बटाटे किसत असताना किसनी लागणार नाही याची काळजी घ्यावी. 

Pic by : Shaila Jagdales  Recipe

Pic by : Shaila Jagdales  Recipe

बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे. मिरची पावडर चे प्रमाण आपण आपल्या पद्धतीने ठेवू शकता. आपल्याला तिखट हवे असेल तर आपण जास्त टाकू शकता आणि जर लहान मुले खाणार असतील तर आपण तिखट कमी टाकले तरी चालेल. त्यानंतर बटाटा लाल मिरची पावडर आणि हिंग हे चांगले एकत्र करून घ्यायचे आहे हाताच्या सहाय्याने. संपूर्ण चांगले एकजीव करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे पूर्णपणे मळून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडं मळून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि बेसन पीठ टाकायचे आहे. बेसन पीठ जसे लागेल तसे मिक्स करत जावे. एकदम एकत्र टाकू नये. सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. आपले पीठ चांगले मळून घ्यायचे आहे. बटाटा ओलसर असल्यामुळे तो पाणी सोडत असतो त्यामुळे आपण हे पीठ मळत असताना याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. पीठ मळायला थोडासा वेळ लागतो पण चांगले मळून घ्यायचे आहे. पीठ चांगलं मळून घेतल्यामुळे आपली शेव खायला चांगली लागते आणि व्यवस्थित सुद्धा होते.

Pic by : Shaila Jagdales  Recipe

Pic by : Shaila Jagdales  Recipe

त्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि गॅस वर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तळण्यासाठी तेल टाकायचे आहे. तेल गरम होईपर्यंत आपल्याला शेव सोडायची मशीन म्हणजेच सोऱ्या घ्यायचा आहे. आपल्याला बारीक पद्धतीने बटाट्याची शेव करायची असल्यामुळे आपण त्या सोऱ्यामध्ये बारीक होल असलेली जाळी लावायची आहे. त्यानंतर सोऱ्यामध्ये आपल्या पिठाचे गोळे करून टाकायचे आहे आणि पीठ चांगले व्यवस्थित त्याच्यामध्ये बसवायचं आहे. पीठ त्याच्यामध्ये बसवल्यानंतर त्याच्यावरती सोऱ्याचं झाकण लावायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सोऱ्याच्या सहाय्याने शेव हळूहळू त्या तेलामध्ये सोडायची आहे. शेवला तांबूस कलर येईपर्यंत तळायचं आहे. जास्त करपू द्यायची नाही शेव. अशा पद्धतीने एक एक करून आपली सर्व शेव तळून घ्यायची आहे.

Pic by : Shaila Jagdales  Recipe

अशा पद्धतीने आपली बटाट्याची शेव पूर्णपणे तयार होईल. ही शेव तुम्ही एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये चांगली पॅक करून ठेवू शकता. जेणेकरून ती मऊ होणार नाही आणि तुम्ही कधीही खाऊ शकता.
Pic by : Shaila Jagdales  Recipe

Pic by : Shaila Jagdales  Recipe


Post a Comment

0 Comments