![]() |
| Pic by -Shaila Jagdales Recipe |
पुराणपोळीला लागणारे साहित्य :- साधारण ३० ते ३५ पुरणपोळी या साहित्यातून होतील.
१) हरभरा डाळ १ किलो
२) गूळ १ किलो
३) मीठ चवीनुसार
४) विलायची सुंठ १ चमचा
५) गव्हाचे पीठ अर्धा किलो
६) मैदा १ वाटी
७) हळद अर्धा चमचा
८) तेल १ वाटी
हे नक्की वाचा :- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वडापाव बनवा.
पुरणपोळी बनवण्याची कृती:-
कृती क्र. १ :- सर्वात आधी एका पातिल्यामध्ये १ किलो डाळीच्या दुप्पट पाणी घ्यावे. पाण्याला उकळी येई पर्यंत गरम करावे. उकळी आल्यानंतर एक पळी तेल टाकावे आणि लगेच १ किलो हरभरा डाळ टाकून साधारण अर्धा तास शिजवून घ्यावे. शिजवून झाल्यानंतर डाळ चाळणीत काढून घ्यावी. डाळ पूर्णपणे कोरडी होऊन द्यावी.
कृती क्र. २ :- १ किलो गूळ किसणीच्या साहाय्याने बारीक करून घ्यावा.
कृती क्र. ३ :- पुरण तयार करण्यासाठी गॅस बारीक पातळीवर चालू करावा व त्यावर डाळ परतण्यासाठी पातीले घ्यावे. डाळ पातिल्यामध्ये टाकून चांगली परतून घ्यावी आणि मग त्यात किसलेला गुळ टाकावा. डाळ आणि गूळ चांगले एकत्र करावे. एकत्र झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, विलायची सुंठ १ चमचा टाकावे. हे सर्व चांगले एकत्र करावे आणि १५ ते २० मिनीट परतून घ्यावे. मिश्रणाला सुटलेले पाणी पूर्ण पणे जाऊ द्यावे म्हणजे आपली डाळ साधारण चिकटसर होईपर्यंत परतावे. मिश्रण चांगले परतून झाल्यानंतर ते मिक्सर किंवा चाळणीच्या साहाय्याने बारीक वाटून घ्यावे. वाटून झाल्यानंतर आपले पुरण तयार होईल.
कृती क्र. ४ :- पुरणपोळीचे पीठ करण्यासाठी अर्धा किलो गव्हाचे पीठ, १ वाटी मैदा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद एका भांड्यात घ्यावे. हे सर्व चांगले एकत्र करून घ्यावे. त्यानंतर थोडेथोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यावे. पीठ पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. जास्त कडक किंवा जास्त पातळ न होता मध्यम मळावे. त्यानंतर पिठामध्ये १ पळी तेल टाकून ते चांगले एकत्र करून घ्यावे. तेल पूर्ण पिठाला लागायला हवे. मळून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून साधारण १५ ते २० मिनिट पीठ चांगले मुरण्यासाठी ठेवावे.
कृती क्र. ५ :- पुरणपोळी करण्यासाठी गॅस बारीक ठेवून त्यावर तवा ठेवावा. त्यांनतर तयार झालेल्या पिठामधून एक पिठाचा गोळा तयार करावा. साधारण लिंबाच्या आकाराएवढा गोळा करावा. त्यानंतर पिठाचा गोळा पुरीच्या आकाराएवढा लाटून घ्यावा आणि ते हातात घेऊन त्याच्या मध्यभागी तयार केलेले पुरण पिठाच्या दुप्पट पटीने घ्यावे. साधारण पिठामध्ये व्यवस्थित बसेल एवढेच पुरण घ्यावे. त्यानंतर पिठ आतल्या बाजूस बंद करावे. म्हणजे आपले पुरण पिठामध्ये जाईल. हे चांगले हातावर गोल गोल करून घ्यावे आणि पिठाचा गोळा फुटून न देता हळूहळू लाटून घ्यावे. पुरणपोळी चांगल्या आकारात व्यवस्थित लाटून घ्यावी. त्यानंतर गरम झालेल्या तव्यावर पुरणपोळी भाजण्यासाठी टाकावी. गॅस कमीच ठेवावा. दोन्ही बाजूने उलट सुलट पुरणपोळी करावी आणि दोन्ही बाजूला कलथ्याच्या साहाय्याने तेल लावावे. पुरणपोळी जास्त करपवून न देता चांगला भाजल्यासारखा रंग आल्यानंतर काढून घ्यावी.
अशा पद्धतीने आपली पुरणपोळी खाण्यासाठी तयार झाली आहे.
पुरणपोळी रेसिपी व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
👉 https://youtu.be/msnPAy83X9g
रेसिपी व्हिडीओ 👇👇👇


2 Comments
सविस्तर मांडणी केली आहे 👌👌 असेच blog आम्हाला वाचायला आवडतील
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Delete