कुरकुरीत आणि चविष्ठ असे उपवासाला लागणारे साबुदाणा वडे बनवा. खालील रेसिपी नक्की वाचा आणि बनवा. 👇
साबुदाणा वड्यासाठी लागणारे साहित्य:-
१) साबुदाणा १०० ग्रॅम २) शेंगदाणे १ वाटी ३) बटाटे २ ४) मिरची ७ ते ८ ५) जिरं १ चमचा ६) तेल तळण्यासाठी ७) मीठ चवीनुसारहि रेसिपी नक्की वाचावी 👉 चमचमीत पद्धतीने रव्याचा उपमा बनवा 👈
साबुदाणा वडा बनवण्याची कृती 👇
सर्वात आधी दोन ते तीन तास आधी साबुदाणे भिजत घालत ठेवायचे आहे. त्यानंतर शेंगदाणे तव्यावर चांगले भाजून घेऊन शेंगदाण्यांचा कूट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत. नंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. आपण हे बटाटे कच्चेच घेतले आहेत. तुम्ही हे बटाटे उकडून सुद्धा घेऊ शकता किंवा कच्चे ही घेऊ शकता. साल काढणीच्या साह्याने पूर्णपणे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर किसणीच्या सहाय्याने बटाटा किसून घ्यायचा आहे. चांगला पातळ पद्धतीने बटाट्याचे कीस व्हायला हवा.
त्यानंतर एक मोठा बाउल घ्यावा. त्यामध्ये बटाट्याचा कीस, भिजत ठेवलेले साबुदाणे मधील पाणी बाजूला काढून साबुदाणे यात टाकायचे, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मिक्सरमध्ये वाटलेली हिरवी मिरची टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे. हे सर्व व्यवस्थित टाकल्यानंतर सगळे मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व पूर्णपणे एकजीव व्हायला हवे या पद्धतीने एकत्र करून घ्यायचे.
त्यानंतर गॅस चालू करून त्यावर कढई ठेवावी. कढईमध्ये तेल टाकावे. गॅस मोठा ठेवावा. त्यानंतर आता आपल्याला पुढे करून घ्यायचे आहे. त्यासाठी हातावरती वडे थापत असताना हाताला ते चिकटू नये यासाठी एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ते पाणी बोटांच्या सहाय्याने तळहातावरती लावून घ्यायचे आहे. त्यानंतर तयार केलेला मिश्रणामधील थोडा मिश्रण घेऊन त्याचा गोळा करून हातावरती थापून घ्यायचे आहे. वड्याचा आकार तयार होईल अशा पद्धतीने ते मिश्रण थापून घ्यावे. वड्याची किनार सुद्धा व्यवस्थित दाबून घ्यावी. वडा थापून झाल्यानंतर गरम झालेल्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचा आहे. अशा पद्धतीने जितके वडे आपल्या कढईमध्ये बसतील तितके एवढे थापून तेलामध्ये सोडायचे आहे.
हि रेसिपी खूप सोप्पी आहे 👉 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा वडापाव रेसिपी 👈
त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने पुढे हलवत राहायचे आहे. यामध्ये झाल्याचा वापर थोडा कमी करावा कारण झाल्यामुळे वडे फुटू शकतात. हळूहळू पुढे अल्टी पलटी करून घ्यावे. वड्यांना चांगला तांबूस कलर येईपर्यंत तळावे. पुढे चांगले तयार झाल्यानंतर झाडाच्या सहाय्याने उचलून घ्यावे आणि त्यातील तेल पूर्णपणे निथळून द्यावे आणि मग ताटामध्ये काढून घ्यावे. अशा पद्धतीने एक एक करून सर्व मिश्रणाचे वडे आपण तयार करून घ्यावे.
अशा पद्धतीने आपले साबुदाणा वडे पूर्णपणे तयार झालेले आहेत. तुम्ही हे साबुदाणा वडे उपवासाच्या दिवशी किंवा कधीही बनवून खाऊ शकता. या रेसिपीच्या पद्धतीने तुम्ही हे साबुदाणा वडे नक्की घरी करून बघा.
या रेसिपीचा व्हिडीओ आपण खाली पाहू शकता. 👇
Tags :-
sabudana vada | sabudana vada recipe in marathi | sabudana vada recipe | sabudana vada kasa banvaycha | sabudana vada kaise banate hain | sabudana vada kashi banvaychi | is sabudana vada healthy | sago vada | sago vada recipe | sabudana vada recipe video | sabudana vada pune | sabudana vada in marathi | sabudana vada images | sabudana vada picture | sabudana vada pics | sabudana vada photos | how to make sabudana vada | how to make sabudana vada in marathi | how to make sabudana vada crispy | crispy sabudana vada | crispy sabudana vada recipe in marathi | how to make crispy sabudana vada at home | crispy sago vada | fasting recipes | fasting food | fasting food in marathi |
साबुदाणा वडा । साबुदाणा वडा कसा बनवायचा । साबुदाणा वडा कसा करतात । साबुदाणा वडा कैसे बनाते है । साबुदाणा वडा कैसे बनाये । साबुदाणा वडा कसा बनवावा । साबुदाणा वडा रेसिपी दाखवा । साबुदाणा वडा रेसिपी मराठी । साबुदाणा वडा रेसिपी इन मराठी । साबुदाण्याचे वडे कसे बनवतात । उपवासाचे पदार्थ । उपवासाचे पदार्थ फोटो । उपवासाचे साबुदाणा वडे । उपवासाचे साबुदाण्याचे वडे । उपवासाला चालणारे पदार्थ ।


0 Comments