Subscribe Us

Header Ads

पुदिना चटणी अशा पद्धतीने बनवल्याचे खूप सुंदर होते । pudina chutney recipe in marathi




घरच्याघरी सोप्प्या पद्धतीने पुदिना चटणी बनवायला शिका - वाचा आणि बनवा

Pic by : Shaila Jagdales Recipe

वडापाव, इडली, ढोसा, सामोसा, उत्ताप्पा, सॅन्डविच अशा अनेक पदार्थांबरोबर आपण या चटणीचा आस्वाद घेऊ शकता.

 साहित्य :-

१) मोहरी १ चमचा २) कडीपत्ता ७ ते ८ पाने ३) साखर १ चमचा ४) तेल १ पळी ५) मीठ चवीनुसार ६) लिंबू अर्धा ७) पुदिना थोडासा ८) कोथिंबीर थोडीशी ९) मिरची ७ ते ८ १०) शेंगदाणे अर्धी वाटी ११) खोबरे अर्धी वाटी पेक्षा कमी

Pic by : Shaila Jagdales Recipe

कृती :-
सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि खोबरे वाटून घ्यायचे आहे. वाटण जास्त बारीक न करता एक-दोन मिक्सरच्या झटक्यामध्येच थांबवायचे आहे. म्हणजे थोडे जाडसर ठेवायचे आहे. त्यानंतर ते वाटलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये तसेच ठेवायचे आहे आणि पुदिना व कोथिंबीर स्वच्छ धुवून व बारीक चिरून ते त्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. म्हणजे पुदिना, कोथिंबीर आणि आधी वाटलेले जाडसर मिश्रण हे सर्व एकदा पुन्हा चांगले बारीक करून घ्यायचे आहे. वाटत असताना त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे. साधारण तीन चार छोटे चमचे इतके. त्यानंतर वाटलेले मिश्रण आपण एका बाऊलमध्ये म्हणजेच वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे.


आता आपल्याला कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर एक छोटे पातेले ठेवायचे आहे. त्या पातेल्यामध्ये एक पळी तेल टाकायचे आहे. तेल थोडे गरम झाले की, त्यात एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. पातेले पक्कडच्या सहाय्याने वरती पकडून थोडसं हलवायचं आहे आणि जास्त वेळ न ठेवता लगेच ते पातेले गॅस वरुन काढून गॅस बंद करावा. त्यानंतर ते तशाच पद्धतीने पक्कडच्या सहाय्याने पातेले उचलून ती फोडणी बाऊलमध्ये काढलेल्या मिश्रणाच्या वर टाकायची आहे. जेणेकरून ही दिलेली फोडणी आपल्या पुदिना चटणीला एक वेगळी चव आणेल. तसेच हे मिश्रण चांगले एका छोट्या चमच्याच्या सहाय्याने संपूर्ण एकत्र करायचे आहे. त्यानंतर त्यात एक चमचा साखर टाकायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मिश्रण एकत्र करायचे आहे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळत असताना एक काळजी घ्यावी की लिंबामधील बिया त्या मिश्रणामध्ये पडता कामा नये. लिंबू पिळल्यामुळे आपली पुदिना चटणी ही काळी पडत नाही व आपली चटणी हिरवीगार राहते. त्यानंतर सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचे आहे. सर्व चांगले मिक्स झाले पाहिजे.

Pic by : Shaila Jagdales Recipe

 

अशा पद्धतीने आपली पुदिना चटणी पूर्णपणे तयार होईल. आपण ही पुदिना चटणी वडापाव, इडली, डोसा, उत्तप्पा, समोसा इत्यादी कशाही बरोबर खाऊ शकता.


पुदिना चटणीचा रेसिपी व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा  👇

👉https://youtu.be/RZER5B2IGPU👈

☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝

Post a Comment

0 Comments