चविष्ठ आणि सुंदर व्हेज पद्धतीची पनीर भुर्जी बनवायला शिका सोप्प्या व सरळ पद्धतीने - वाचा आणि बनवा
साहित्य :-
पनीर १५० ग्रॅम
तेल १ लहान पळी
मीठ चवीनुसार
गरम मसाला १ चमचा
लाल मिरची पावडर २ चमचे
चिकन मसाला १ चमचा
हळद अर्धा चमचा
टोमॅटो १
कांदा १ मोठा
कोथिंबीर थोडी
सर्वात आधी १ टोमॅटो, १ मोठा कांदा आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर गॅस पेटवून त्याच्यावर फ्राय पॅन ठेवायचे आहे. गॅस मोठा ठेवावा. फ्राय पॅन गरम झाल्यानंतर एक पळी तेल टाकायचे आहे. तेल फ्राय पॅनच्या सर्व बाजूला लागेल अशा पद्धतीने फ्राय पॅन फिरवायचा आहे. तेल गरम झाल्यानंतर चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा गुलाबी तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो व कांदा चांगला एकत्र करून घ्यायचा आहे.
हे वाचले का ? 👉 चमचमीत गाजराचा हलवा रेसिपी बनवा अशा पद्धतीने 👈
त्यानंतर गॅस बारीक करून दोन चमचे लाल मिरची पावडर, गरम मसाला एक चमचा, चिकन मसाला एक चमचा, हळद अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकायचे आहे. तसेच गॅस बारीक ठेवून हे सर्व चांगले एकत्र करून घेऊन परतून घ्यायचे आहे. त्यानंतर पावशेर पनीर घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्यामध्ये टाकायचे आहे. आता गॅस मोठा करून सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. कलथ्याच्या सहाय्याने सर्व मिश्रणाची भुर्जी करून घ्यायची आहे. चांगली भुर्जी तयार झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. भुर्जी ला चांगला तांबूस कलर येईपर्यंत परतायची आहे. फक्त जास्त करपू द्यायची नाही. झाल्यानंतर एका प्लेटमध्ये भुर्जी काढून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपली व्हेज पद्धतीची पनीर भुर्जी तयार झालेली आहेतुम्ही ही भुर्जी पाव, चपाती, भाकरी किंवा कशाही बरोबर खाऊ शकता.

0 Comments