सोप्या आणि सरळ पद्धतीने गाजराचा हलवा बनवायला शिका - वाचा आणि बनवा 👇
| Pic by - Shaila Jagdales Recipe |
हलव्यासाठी लागणारे साहित्य :- 👇
१) तूप अर्धी वाटी २) मलई (दुधावरील साय) अर्धी वाटी ३) दूध अर्धी वाटी ४) साखर अर्धी वाटी ५) बदाम ५ ते ६ ६) मनुके ६ ते ७ ७) गाजर ४ लहान (मोठे असतील तर २) ८) काजू ५ ते ६ ९) लाल कलर (हवा असल्यास टाकावा) १०) विलायची सुंठ पावडर १ चमचा
![]() |
| Pic by - Shaila Jagdales Recipe |
हेही अवश्य वाचा 👉 पुरणपोळी चुकत आहे , आता बनवा अशा पद्धतीने पुरणपोळी
कृती :-
सर्वात आधी काजू आणि बदामाचे मधून दोन काप करून घ्यायचे. त्यानंतर गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवावी. कढई मध्ये साधारण एक ते दीड चमचा तूप टाकायचे. तूप थोडे गरम झाल्यानंतर मनुके त्या तुपात भाजून घ्यायचे. मनुके जास्त करपवायचे नाही. मनुके भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आणि त्याच तुपात काजू भाजून घ्यायचे. काजू लालसर भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. त्यानंतर बदाम टाकायचे भाजण्यासाठी आणि हे सर्व करत असताना गॅस बारीक ठेवायचा आहे, कारण मनुके, काजू, बदाम करपायला नको.
| Pic by - Shaila Jagdales Recipe |
सर्व भाजून झाल्यानंतर गाजर स्वच्छ धुवून घेऊन किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहे. किसून झाल्यानंतर गॅसवरील कढई मध्ये साधारण 2 चमचे तूप टाकायचे आणि किसलेले गाजर त्यात मिक्स करायचे. गॅस मोठा ठेवावा. त्यानंतर अर्धी वाटी दूध त्यात टाकायचे. सर्व चांगले शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅस बारीक करून कढईवर झाकण ठेवावे. साधारण 4 ते 5 मिनिट शिजून द्यायचे. त्यानंतर त्यात अर्धी वाटी साखर टाकायची आणि सर्व चांगले एकत्र करून घ्यायचे. साखर पूर्ण त्यात विरघळली पाहिजे. त्यानंतर अर्धी वाटी मलई त्यात टाकायची व गॅस मोठा करून सर्व मिश्रण चांगले हलवत राहायचे आहे. त्यानंतर आपण भाजून घेतलेले काजू, बदाम आणि मनुके त्यात टाकायचे. सर्व चांगले एकत्र करायचे आणि सतत हलवत राहणे. त्यानंतर त्यात विलायची आणि सुंठ पावडर एक चमचा टाकावे. थोडासा खायचा लाल कलर टाकावा (कलर फक्त रंग येण्यासाठी आहे त्याने चवीत फरक पडत नाही, टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल). गॅस मोठाच ठेवावा आणि सर्व मिश्रण सतत हलवत रहायचे आहे. हलव्यातील पाणी आटून द्यायचे आहे. तसेच जोपर्यंत आपला हलवा पूर्ण होत नाही तोपर्यंत हलवत राहणे , जर आपण न हलवता शिजवले तर हलवा करपू शकतो, त्यामुळे सतत हलवत राहणे..
सर्व पाणी आटल्यानंतर आपला गाजराचा हलवा पूर्ण होईल. त्यानंतर गॅस बंद करावा आणि हलवा एका बाउल मध्ये किंवा भांड्यात कडून घ्यावा...
अशा पद्धतीने आपला गाजराचा हलवा पूर्ण झाला आहे..
गाजराचा हलवा रेसिपी व्हिडीओ 👇👇


3 Comments
खूप छान माहिती
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteअतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीत माहिती दिली आहे
ReplyDelete