गणेश चतुर्थी म्हणजेच गणेशोत्सवानिमित्त करा ड्राय फुड्स चे मोदक - वाचा आणि बनवा
 |
| Pic by :- Shaila Jagdales Recipe |
ड्राय फूड्स चे मोदक हे खूप सोपे आणि सरळ पद्धतीने होतात. महत्त्वाचे म्हणजे यांना उकड घ्यावी लागत नाही. हे खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये बनवून तयार होतात.
साहित्य :-
१) ओला खजूर २०० ग्रॅम
२) काजू १२ ते १५
३) बदाम १२ ते १५
४) तूप २ चमचे
५) विलायची पावडर १ चमचा
 |
| Pic by :- Shaila Jagdales Recipe |
कृती :-
सर्वात आधी काजू आणि बदाम या दोन्हींचे बारीक काप करून घ्यायचे. ज्याप्रमाणे जाडसर शेंगदाण्याचा कूट असतो साधारण तितक्या मापाचे सुरीच्या सहाय्याने काजू आणि बदामाचे काप करून घ्यायचे आहे.
त्यानंतर घेतलेल्या ओल्या खजुरांच्या बिया काढून फेकून द्यायच्या आहेत. फक्त खजूर आपल्याला घ्यायचे आहेत बिया घ्यायच्या नाहीत. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर घेऊन मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे. खजूर बारीक करत असताना त्यामध्ये पाण्याचा वापर करू नये. त्यामुळे आपले मोदक खराब न होता टिकतात.
आता आपल्याला मोदकाचे महत्त्वाचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅस चालू करून त्यावर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचे आहे. गॅस बारीक प्रमाणात ठेवावा. त्यानंतर बारीक काप केलेले काजू बदाम त्यामध्ये टाकायचे आहे. सर्व चांगले परतून घ्यायचे आहे. काजू बदाम करपू नये याची काळजी घ्यावी. थोडेसे लालसर तांबूस होईपर्यंत परतावे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेले खजूर कढईमध्ये टाकायचे आहे. खजूर हा काजू बदाम मध्ये चांगला मिक्स व्हायला हवा असा परतून घेणे. त्यानंतर एक चमचा तूप त्या मिश्रणामध्ये टाकावे आणि सर्व चांगले एकत्र करावे. सर्व मिश्रण चांगले परतून झाल्यानंतर हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यावे. मिश्रण खूप गरम असल्यास थोडं थंड म्हणजेच साधारण कोमट होऊ द्यावे.
 |
| Pic by :- Shaila Jagdales Recipe |
मिश्रण थंड झाल्यानंतर हे सर्व चांगले मिळून घ्यायचे आहे. काजू बदाम खजूर सर्व एकमेकात मिक्स व्हायला हवेत चांगले एकत्र पिठाप्रमाणे एकजूट व्हायला हवे. त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर टाकावी आणि पुन्हा एकदा हे सर्व चांगले एकत्र करून घ्यावे. मिश्रण जितके चांगले मळून घ्याल तितकेच आपले मोदक छान होतील. सर्व मिश्रण चांगले एकत्र झाल्यानंतर हे सर्व मोदक करण्यासाठी तयार होईल. अशा पद्धतीने आपले मोदकाला लागणारे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे.
आता महत्त्वाचे आपल्याला मोदक करून घ्यायचे आहे. त्यासाठी एक मोदकाचा साचा घ्यावा. त्या साच्यामध्ये बोटांच्या सहाय्याने किंचित तूप सगळीकडे लावून घ्यावे. हे तूप प्रत्येक वेळी लावू नये. आपले मोदक व्यवस्थित निघावे यासाठी आपण हे तूप लावत आहोत. तूप लावल्यानंतर साच्याचे तोंड म्हणजेच लॉक लावून घ्यावे आणि आपले मिश्रण थोडे थोडे करून मोदकाच्या साच्यामध्ये भरायचे आहे. मिश्रण चांगले मोदकाच्या साच्यामध्ये भरून घ्यायचे आहे आणि भरून झाल्यानंतर शेवटचा भाग तळ हाताच्या साह्याने दाबून घ्यावा. त्यानंतर आपल्या साच्याचे लोक उघडावे आणि हळुवारपणे आपला मोदक त्यातून बाहेर काढावा. अशा पद्धतीने आपला मोदक पूर्णपणे तयार होईल. असे एक एक करून सर्व मिश्रणाचे मोदक तयार करून घ्यायचे आहे. आपले मोदक प्रसादासाठी आणि खाण्यासाठी तयार झाले आहे.
 |
| Pic by :- Shaila Jagdales Recipe |
अशा पद्धतीने आपले ड्राय फूड्स चे मोदक पूर्णपणे तयार झाले आहे.
या गणेशोत्सवानिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा...! 🙏 गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया ! 🙏
Tags :-
मोदक बनवण्याची सोपी पद्धत | उकडीचे मोदक कसे बनवायचे | मोदक कसे बनवायचे | उकडीचे मोदक कसे बनवायचे । उकडीचे मोदक फोटो । उकडीचे पदार्थ । उकडीचे मोदक कसे करायचे । मोदक रेसिपी । मोदक बनाने की विधि । मोदक रेसिपी मराठी । मोदक साचा । मोदक images । उकडीचे मोदक । उकडीचे मोदक कसे बनवतात । उकडीचे मोदक कसे करायचे । उकडीचे मोदक रेसिपी मराठी । उकडीचे मोदक बनवण्याची पद्धत । उकडीचे मोदक कसे बनवायचे दाखवा । उकडीचे मोदक फोटो । उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी । उकडीचे मोदक रेसिपी मराठी । गणपती मोदक फोटो । गणपतीचे मोदक कसे बनवायचे । गणपतीचे मोदक कसे बनवतात । मोदक गणपती बाप्पा । मोदक सारण प्रमाण । ड्राय फूड्स मोदक । खजूर मोदक । काजू मोदक । बदाम मोदक
ukadiche modak | ukadiche modak recipe | modak dumplings | modak in marathi | modak recipe | modak recipe marathi | modak kaise banate hain | modak ki recipe | modak kaise banane ka | modak kaise banvae | modak images | ukadiche modak | ukadiche modak recipe | ukadiche modak recipe in marathi | tandalache ukadiche modak recipe in marathi | ukadiche mango modak recipe in marathi | simple ukadiche modak recipe in marathi | easy modak recipe in marathi | instant modak recipe in marathi | easy modak recipe in hindi | modak kase banvayche | modak kashi banvaychi te dakhva | modak kasa banavtat | modak kasa karaycha dakhva | modak benefits | gud ke modak recipe | ganpati modak | ganpati modak images | ganpati modak photo | ganpati modak recipe | sweet modak ganpati | sweet modak food | how to make modak | how to make modak saran | dry food modak | khajur modak | khajur modak recipe | khajur modak recipe in marathi | kaju modak recipe in marathi | badam modak recipe |
Hashtags :-
#modak #ukadichemodak #sweet #maharashtrafood #dryfoodmodak #मोदक
0 Comments