![]() |
| Pic by - Shaila Jagdales Recipe |
बकऱ्याच्या पायाचे सूप खालील साहित्य आणि पद्धत वापरून बनवा. 👇👇
साहित्य:-
१) बकऱ्याचे पाय - ४ (पाय केस असलेले घ्यावे)
२) तेल - २ पळी
३) लवंग - ४ ते ५
४) काळीमिरी - ४ ते ५
५) तेजपत्ता - ५ ते ६
६) कांदे - २
७) टोमॅटो - १
८) मीठ - चवीनुसार
९) हळद - १ चमचा
१०) आलं लसूण पेस्ट - २ चमचे
बकऱ्याच्या पायाचे सूप रेसिपीचा व्हिडीओ पहा :-
![]() |
| Pic by - Shaila Jagdales Recipe |
कृती क्र. १ :- सर्वात आधी बकऱ्याचे पाय भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी घराबाहेर लोखंडी घमिले घ्यावे आणि त्यात निखारा करावा (आपल्याकडे घमिले नसेल तर तुम्ही गॅसवर किंवा स्टो वर पाय भाजू शकता). लोखंडी घमिल्यामध्ये आग लागल्यानंतर त्यात पाय भाजण्यासाठी टाकावे. आग कमी झाल्यावर लाकडाची फाटी टाकत रहावी. चिमट्याच्या साहाय्याने पाय भाजावे. पायावरील पूर्ण केस जळायला हवे. त्याप्रमाणे पाय भाजावे. केस जळाले की वास येत नाही. तयानंतर भाजून झाले की सुरीच्या साहाय्याने घासायचे आहे. सूरी पायांवर अशा पद्धतीने फिरवावी कि ज्यामुळे पायावरील जळालेला भाग व्यवस्थित निघेल. काळजीपूर्वक सूरी हाताळावी. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने नखे काढून घ्यावी. नखे वापरायची नाही ते फेकून द्यायचे आहेत. नखे काढल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला एक आवरण असते पायाच्या कोपऱ्यात ते सुद्धा काढून घ्यावे. त्यानंतर कोयत्याच्या साहाय्याने पायाचे तुकडे करून घ्यावे. साधारण एका पायाचे ४ तुकडे होतात. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन पायाचे हे सर्व तुकडे दोन वेळा स्वच्छधुवून घ्यावे. त्यांनतर सूप तयार करण्यासाठी बकऱ्याचे पाय तयार आहेत.
हेही अवश्य वाचा :- पुरणपोळी चुकत आहे , आता बनवा अशा पद्धतीने पुरणपोळी 👈 क्लिक करा.
कृती क्र. २ :- त्यानंतर गॅस चालू करावा. सूप करण्यासाठी एका गॅसवर तवली किंवा पातेले घ्यावे आणि दुसऱ्या गॅसवर एक छोटे पातेले घेऊन त्यात एक तांब्या पाणी टाकावे आणि पाणी कोमट होण्यासाठी ठेवावे. हे पाणी नंतर तयार होणाऱ्या सुपाच्या पातेल्यात टाकण्यासाठी आहे. पहिले पातेले गरम झाले की, त्यात २ पळी तेल टाकावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात काळीमिरी, लवंग, तेजपत्ता टाकावे आणि परतावे. त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यावा आणि चिरलेला कांदा पातेल्यात टाकावा. कांद्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतावे. गॅस मोठाच ठेवावा. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात टोमॅटो बारीक चिरून टाकावा. टोमॅटो त्या मिश्रणात चांगला एकजीव होऊद्या आणि चांगला परतून घ्यावा. त्यांनतर त्यात हळद १ चमचा, आलं लसूण पेस्ट २ चमचे टाकावे आणि चांगले एकत्र करून घ्यावे व परतत रहावे. त्यांनतर चवीनुसार मीठ टाकावे आणि स्वच्छ धुवून घेतलेले बकऱ्याच्या पायाचे तुकडे त्यात टाकावे. चांगले सर्व एकत्र करायचे आहे. एकत्र केल्यानंतर बाजूच्या गॅसवर ठेवलेल्या दुसऱ्या पातेल्यातील गरम झालेले पाणी या पातेल्यात टाकावे. पाणी पूर्ण न टाकता थोडे पाणी शिल्लक ठेवावे. त्यानंतर आपले मिश्रण चांगले कलथ्याच्या साहाय्याने हलवावे. हलवून झाल्यानंतर त्यावर एक ताट ठेवावे आणि त्या ताटामध्ये शिल्लक ठेवलेले गरम पाणी टाकावे. यामुळे आपले सूप वाफेवर चांगल्या पद्धतीने शिजेल. वरून आणि खालून दोन्ही बाजूने गरम असल्यामुळे आपले बकऱ्याचे पाय चांगल्या प्रकारे शिजतील. ताटाला येणार शेद खालील पातेल्यात पडेल. ज्यामुळे आपले सूप चांगले होईल. त्यानंतर गॅस मोठाच ठेवावा आणि साधारण अर्धा ते पाऊण तास तसेच शिजत ठेवावे. मध्ये मध्ये पाहत जावे. अर्धा ते पाऊण तास झाल्यांनंतर झाकण काढावे.
अशा पद्धतीने आपले बकऱ्याच्या पायाचे सूप तयार झाले आहे. हे खाल्य्याने गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा हाडांचे आजार बरे होतात. शरीरामध्ये कॅल्शियम वाढते व ऊर्जा तयार होते.
![]() |
| Pic by - Shaila Jagdales Recipe |
रेसिपी व्हिडीओ 👇👇👇




0 Comments