झटपट कुरकुरीत कांदा भजी बनवा अगदी सोप्य्या पद्धतीने - वाचा आणि बनवा 👇
साहित्य :-
१) कांदे २ मोठे
२) लाल मिरची पावडर २ चमचे
३) मीठ चवीनुसार
४) जिरं १ चमचा
५) तेल तळण्यासाठी
६) बेसन पीठ अर्धा किलो (लागेल तसे घ्यावे)
७) हिरव्या मिरच्या ८ ते १० तळण्यासाठी (भजीबरोबर खाण्यासाठी)| Pic by :-Shaila Jagdales Recipe |
कृती :-
सर्वात आधी आपण घेतलेले कांद्याची साल काढून घ्यावी आणि कांदा हा उभ्या पद्धतीचा चिरून घ्यावा उभा पद्धतीचा चिरल्यामुळे आपली खेकडा कांदा भजी खूप सुंदर होते त्यामुळे उभ्या पद्धतीचा व पातळ पद्धतीचा कांदा चिरून घ्यावा.
हेही नक्की वाचा 👉 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा वडापाव रेसिपी 👈
त्यानंतर गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवावी आणि कढईमध्ये तळण्यासाठी तेल घ्यावे. गॅस बारीक करून ठेवावा. तेल गरम होईपर्यंत भजीला लागणार मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. ताटामध्ये काढून घेतलेला उभा चिरलेला कांदा हाताच्या सहाय्याने चांगला सुट्टा करून घ्यावा. कांद्याचे सर्व पाते मोकळे व्हायला हवे. असे मोकळे करून घेतल्यामुळे मिश्रणामध्ये कुठल्या तयार होत नाहीत व आपली भजी सुद्धा खूप सुंदर होते. कांद्याचे असे पाते म्हणजेच स्लाईस वेगवेगळे केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, मिरची पावडर दोन चमचे (मिरची पावडर आपल्या पद्धतीने घेऊ शकता) घ्यायचे आहे. मिरची पावडर, कांदा, मीठ हेच चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर एक चमचा जिरे घ्यायचे आहे आणि ते दोन्ही हातांमध्ये ठेवून मळायचे आहेत. जेणेकरून जिऱ्यामुळे भजीला सुंदर सुगंध येतो. जिरे मिळून झाल्यानंतर मिश्रणामध्ये टाकायचे आहे आणि सर्व चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडे थोडे करून बेसन पीठ आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचे आहे आणि हे मिश्रण चांगले एकत्र करायचे आहे. लक्षात ठेवावे की बेसन पीठ हे जसे लागेल तसेच घ्यावे. खूप जास्त किंवा खूप कमी बेसन पीठ घेऊ नये. त्यानंतर थोडेसेच पाणी टाकायचे आहे आणि पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचे आहे. त्याचा कोरडेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने सर्व एकत्र करायचे आहे. पाणीसुद्धा जास्ती न टाकता थोडेच टाकावे जास्त आपल्या मिश्रणाचा गाळ होता कामा नये. अशा पद्धतीने आपले खेकडा कांदा भजीचे मिश्रण तयार होईल.
तेल गरम झाल्यानंतर मिश्रणामधील भजी सोडता येईल इतक्या प्रमाणात मिश्रण उचलून तेलामध्ये सोडायचे आहे. पातळ पद्धतीने मिश्रण उचलून त्यात टाकायचे आहे जाड मिश्रण टाकू नये. तेलात सोडत असताना एकदम मध्येच न सोडता बाजूने सोडायचे आहे. म्हणजे भजी बरोबर खाली जाऊन शिकते. असे एक एक करून कढईमध्ये जितकी बसेल तितकी भजी सोडायची आहे. त्यानंतर झाऱ्याच्या सहाय्याने भजी पलटी करायची आहे आणि सतत अल्टी पलटी करून हलवत राहणे. भजीला तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे जास्त भजी करपू द्यायची नाही. तळून झाल्यानंतर झाऱ्याच्या सहाय्याने भजी उचलून घेऊन तेल निथळून द्यायचे आहे आणि ताटामध्ये भजी काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने उर्वरित सर्व मिश्रणाची खेकडा कांदा भजी तळून घ्यायची आहे. त्यानंतर आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेऊन त्यांना मध्ये सुरीच्या सहाय्याने चिरा मारून तेलामध्ये पाच ते सहा सेकंद तळून घ्यायचे आहे आणि त्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून त्यावर चवीनुसार मीठ सोडायचे आहे. म्हणजे आपण कांदा भजी बरोबर या तळलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा खाऊ शकतो आणि त्याचा एक वेगळा आनंद घेऊ शकतो.

0 Comments